(MPSC PSI Admit Card)पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली |
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा- २०२३ शनिवार, दिनांक ०२ डिसेंबर, २०२३ रोजी घेण्याचे नियोजित होते. तथापि, प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येऊन दिनांक ०२ डिसेंबर, २०२३ ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच रविवार, दिनांक १० डिसेंबर, २०२३ रोजी आयोजित करण्यात येईल.
MPSC PSI Exam Date Change : जर तुम्ही देखील ही स्पर्धा पूर्व परीक्षा देत असाल तर या सूचना लक्षात ठेवा
- परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाउनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेशपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
- परीक्षा सुरु होण्यापूर्वी दीड तासआधी केंद्रावर हजर राहाणे अनिवार्य आहे. तसेच स्वत:चे ओळखपत्र, आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक ओळखपत्र
- परीक्षा कक्षात मोबाईल अथवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नाही. परीक्षा कक्षेत कोणतेही गैरवर्तन करण्याचा प्रकार केल्यास कारवाई करण्यात येईल.
अधिकृत वेबसाइट वरील जाहिरात खाली दिली आहे
